Wednesday, December 19, 2012

एक होती ठम्माबाई


एक होती ठम्माबाई
तिला सोशल वर्कची घाई
रात्रंदिवस हिंडत राही
पण वर्कच कुठे उरलें नाही.

वर्क थोडे बाया फार
प्रत्येकीच्या घरची कार
नोकर- शोफर- बेरा- कुक
घरात आंबून चाललें सुख
घराबाहेर दु:ख फार
करीन म्हणते हलका भार
कार घेऊन निघते रोज
हरेक दु:खावरती डोज-
पाजीन म्हणते: पिणार कोण?
सगळ्या जणींना करते फोन
“मला कराल का हो मेंबर?”
“अय्या, सॉरी, राँग नंबर!”
“सगळ्या मेल्या मारतात बंडल”
म्हणून स्वतःच काढते ‘मंडळ’!

                               -(पु.ल.दे.)

No comments:

Post a Comment