Wednesday, December 19, 2012

चला खोदत जाऊ


या झोपाळलेल्या झाडांच्या निगरगट्ट दाटीत
आपली वाढ होईल असे वाटत नाही,
काळाकुट्ट किर्र काळोख सरकवित
एखादा किरण इकडे येईल असे वाटत नाही.
हमेशाच अंतर बाळगून वागणारे हे आपले लोक!
ऐनवेळी यांचे रक्त आपल्या रक्ताला जुळेल असे वाटत नाही.


मग कशासाठी हे एकेरी जीव जाळून आळवणे, भजने?
या दगडांकडून या दोह्यांना कधी प्रतिसाद मिळेल असे वाटत नाही.
आपल्यापुरता उजेड घेऊन उडणारे हे बारिक जीव!
यांच्या लुकलुकण्यात सगळे विश्व लखाकेल असे वाटत नाही.
चला खोदत जाऊ आता हा पहाड सगळा,
आपली तहान या वाढलेल्या पाण्यावर भागेल असे वाटत नाही.

                                       -भगवान माधवराव परसवाळे

No comments:

Post a Comment