Tuesday, December 18, 2012

नोकरी

एकदा एक पैलवान नोकरी करण्यासाठी शहरात येतो, पण शिकलेला नसल्यामुळे त्याला कोणीच नोकरी देत नाही.

त्यामुळे त्याचे जेवणाचे वांदे होतात. तेव्हा रस्त्यात त्याला एक केळेवाला दिसतो. पैलवान लगेच त्याला बद्डून
३-४ डझन केळी घेउन खायला लागतो.

त्याचवेळी तिथून प्राणिसंग्रहालय ­ाचा मालक जात असतो. तो पैलवानाला बाजुला घेउन विचारतो

“अरे , किति दिवस असा चोरुन खाणार आहेस? माझ्याकडे काम कर , दिवसाचे १०० रुपये आणी पाहिजे

तेव्हढे जेवण मिळेल.



मग पैलवान त्याच्याबरोबर zoo मध्ये जातो, तिथे त्याला एक गोरिलाची कातडी मिळते जी त्याला , दिवसभर पांघरुन रहायचई असते.



असाच एका दिवशी , तो पिंजऱ्याला टेकुन उभा, राहिला असताना , पिंजऱ्याची भिंत तुटते आणी तो सिंहाच्या पिंजऱ्यात जाउन पडतो.



त्याबरोबर , तो “वाचवा , वाचवा ” ओरडत पळु लागतो, सिंह त्याच्या जवळ आलेला असतो , तो गोरिलाच्या तोंडावर हात ठेवुन म्हणतो



“गप्प बैस , नाहितर दोघांचीही नोकरी जाईल !

No comments:

Post a Comment