Wednesday, December 19, 2012

संस्मरण



तुमच्यामुळेच मला माझ्या रस्त्याने इथवर येता आले
वर्तुळाबाहेरचे जग वर्तुळातच अनुभवता आले
तुमच्यामुळेच मला माझ्याशी समरस होता आले
तुमच्यामुळेच मला माझे स्वत्त्व टिकवता आले

तुमच्यामुळेच माझे खिन्न मन प्रसन्न होत गेले
हे जीवन किती सुंदर आहे असे वाटू लागले
तुमच्यामुळेच मला माझ्या जवळजवळ जाता आले
छोट्या गोष्टीतही किती अर्थ आहे हे कळू लागले
तुमच्यामुळेच मला शब्दांचे आव्हान स्वीकारता आले
तुमच्यामुळेच माझे गाणे माझ्या प्रेमाचे प्रतीक बनले

                                                -गोविंद कुलकर्णी

No comments:

Post a Comment