Monday, December 24, 2012

मैत्री

मैत्रि तुझी अशी असवी,
आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,
नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,
सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,
एकमेकांना समजुन घ्यावे,

मैत्रि आपण अशी जगवी,
एकमेकांचा आधार असावी,

सुख दुखात नेहमी सोबत असवी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,

तुझी मझी मैत्रि अशी असावी....:D

बाबा

प्रिय बाबा,

मला फार अभिमान आणि गर्व आहे कि तुमचे आडनाव माझ्या नावासोबत लावते. तुम्ही मला लहानाची मोठी केली. शिक्षण दिले आणि आपल्या पायावर उभी करून एक सक्षम नागरिक बनवले.

पण हि काय भारतीय परंपरा, कि तुम्हीच मला जेव्हा आईला आणि तुम्हाला माझी खरी गरज असते तेव्हा माझे आडनाव बदलण्यास भाग पाडता.

तुमची लाडकी ,

मुलगी

Sunday, December 23, 2012

शब्द आणि प्रेम


शब्दाना मांडत होते काव्य
बनविण्यासाठी 

शब्द शब्द जोडून
भावना व्यक्त करण्यासाठी 
काळजात जी जागा दिली तू त्या वर घरटे
बाधण्यासाठी

कधी आळवीत होते
मनाला तुझ्या जवळ जाण्या साठी

आज अधीर मंन माझे
तुझ्या मनाशी गुताण्यासाठी.... ♥ 

मास्तर ब्लास्टर (Master Blaster)



"I c myself when i c Sachin
batting.- Don Bradman(AUS)
"I want my son to become Sachin
Tendulkar." -Brian Lara(WI)
''V did not lose 2 a team called
India, v lost 2 a man called
Sachin''
- Mark Taylor(aus)


Friday, December 21, 2012

फक्त दोन मिनिट वेऴ द्या आणि नक्की वाचा.



फक्त दोन मिनिट वेऴ द्या आणि नक्की वाचा...)

देशात दर सातव्या मिनिटाला महिलांवर कोणता ना कोणता अत्त्याचार नोनंदवला जात आहे


दर 54व्या मिनिटाला किमान एक महिला बलात्काराची शिकार होत आहे.....


1तास 42 मिनिट मध्ये एक हुंडा बळी घेतला जात आहे.....




२१ डिसेंबर




आज २१ डिसेंबर,
आज काही जगबुडी होणार नाही यात काही एक शंका नाही...

पण वाढत्या धकाधकीच्या जिवना माणुस किती सुरक्षीत आहे हे पण आपल्याला माहीत आहे.....

इथे माणसांची गर्दी आहे पण माणुसकी असलेल्या माणसांची नाही.
आपण फक्त ऐकतो आणि विश्वास ठेवतो.
सत्य काय याची शहानिशा कधीच करत नाही.
जगण्याचा मार्ग पहा विचार करा आणि ठरवा.

जिवनातील प्रत्येक दिवस असा जगा की तो आपला शेवटचा दिवस असेल.....

 - Courtesy : पाहिलं प्रेम कसं विसरायचं ? 

Wednesday, December 19, 2012

राजकुमार

एक होता वेडा राजकुमार तिच्यावर खुप प्रेम करायचा...

होता एक वेडा राजकुमार
तिच्यावर खुप प्रेम करायचा...
आठवण तिची आल्यावर
कविता करत बसायचा..

वेदना

वेदना भरपुर इथे अन,

अमाप दुःखे रडण्यासाठी

सहजच मिळतील हजार जागा

एकांतामधे कुढण्यासाठी

तरीही आहे आज इथे मी

मैफ़िलीस या हसविण्यासाठी.

प्रेम

आपण आपलं मस्तीत जगावं
हॉटेलात जावं.. खावं - प्यावं...
पोरींचं बिल उगाच भरू नये;
प्रेम कुणावरही करू नये..!!!

ती समोर असताना

ती समोर असताना …मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं.. मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं..
तिने कित्ती सुंदर दिसावं.. जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं.. तासन तास पाहत रहावं..
तिने कित्ती गोड बोलावं.. ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं .. सोबत तिच्या..
तिने कित्ती साधं रहावं .. त्यातहीरूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव .. अदांवरतिच्या..
तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं.. अश्रूंनी तिच्या..
तिचं हसणं .. कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं.. गालावरल्या खळीत तिच्या..
तिच्या नजरेने मलाच शोधावं..अचानकनज रेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं.. लाजेने चूर चूर व्हावं..
तिने फक्त माझंच रहावं.. मीही फक्ततिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी..विर हाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं...!!!!

विसरलोय मी....

विसरलोय मी....
.
विसरलोय मी...
तिची न माझी झालेली पहिली भेट
विसरलोय मी...
जी मनात बसली होती एकदम थेट

विसरलोय मी....
तिने त्या दिवशी घातलेला अबोली कलरचा ड्रेस
विसरलोय मी....
तेव्हाचे तिचे वार्यावर उडणारे काळे केस

स्वप्न

ते स्वप्न तरी काय पाहू ज्यात तु नाही
सांग तरी उरलेल्या आयुष्याच करु तरी काय ज्यात तु नाही
तो मोबाईल हि काय ज्यावर तुझा काँल नाही
सांग तरी sms वाचु तरी कुणाचे ज्यात तुझा SMS नाही

एक होती ठम्माबाई


एक होती ठम्माबाई
तिला सोशल वर्कची घाई
रात्रंदिवस हिंडत राही
पण वर्कच कुठे उरलें नाही.

संस्मरण



तुमच्यामुळेच मला माझ्या रस्त्याने इथवर येता आले
वर्तुळाबाहेरचे जग वर्तुळातच अनुभवता आले
तुमच्यामुळेच मला माझ्याशी समरस होता आले
तुमच्यामुळेच मला माझे स्वत्त्व टिकवता आले

चला खोदत जाऊ


या झोपाळलेल्या झाडांच्या निगरगट्ट दाटीत
आपली वाढ होईल असे वाटत नाही,
काळाकुट्ट किर्र काळोख सरकवित
एखादा किरण इकडे येईल असे वाटत नाही.
हमेशाच अंतर बाळगून वागणारे हे आपले लोक!
ऐनवेळी यांचे रक्त आपल्या रक्ताला जुळेल असे वाटत नाही.

Tuesday, December 18, 2012

नोकरी

एकदा एक पैलवान नोकरी करण्यासाठी शहरात येतो, पण शिकलेला नसल्यामुळे त्याला कोणीच नोकरी देत नाही.

त्यामुळे त्याचे जेवणाचे वांदे होतात. तेव्हा रस्त्यात त्याला एक केळेवाला दिसतो. पैलवान लगेच त्याला बद्डून
३-४ डझन केळी घेउन खायला लागतो.

त्याचवेळी तिथून प्राणिसंग्रहालय ­ाचा मालक जात असतो. तो पैलवानाला बाजुला घेउन विचारतो

“अरे , किति दिवस असा चोरुन खाणार आहेस? माझ्याकडे काम कर , दिवसाचे १०० रुपये आणी पाहिजे

तेव्हढे जेवण मिळेल.



मग पैलवान त्याच्याबरोबर zoo मध्ये जातो, तिथे त्याला एक गोरिलाची कातडी मिळते जी त्याला , दिवसभर पांघरुन रहायचई असते.



असाच एका दिवशी , तो पिंजऱ्याला टेकुन उभा, राहिला असताना , पिंजऱ्याची भिंत तुटते आणी तो सिंहाच्या पिंजऱ्यात जाउन पडतो.



त्याबरोबर , तो “वाचवा , वाचवा ” ओरडत पळु लागतो, सिंह त्याच्या जवळ आलेला असतो , तो गोरिलाच्या तोंडावर हात ठेवुन म्हणतो



“गप्प बैस , नाहितर दोघांचीही नोकरी जाईल !

आई फक्त तुझ्यासाठी


आई फक्त तुझ्यासाठी
आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥

कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥

क्रिकेट विरुद्ध प्रेयसी Cricket Vs Girlfriend


१) पुढचा सर्व महिनाभर मी फक्त माझ्या मित्रांशीच जास्तीत जास्त वेळ बोलेन. त्यांच्या घरी मॅच पहायला जाईन किवा त्यांना माझ्या घरी बोलवेन. त्यामुळे तुला माझ्यासाठी वेळच नाही अशी भुणभुण करायची नाही. केल्यास दुर्लक्ष केले जाईल.

२) माझा फोनही याकाळात बिझी असेल. तेव्हा फोन घेतला नाही म्हणून सतत करायचा नाही. एसएमएस पाठवायचे नाहीत. इग्नोरच केले जातील. फोन बिझी असला तर मी क्रिकेटवर चर्चा करतोय असे समजून गप्प बसायचे.

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय?

मुंबई मुंबई मुंबई तिथे आहेतरी काय.
१० रूपयाला वडापाव आणि ५ रुला चाय.
आला पाहुना घरी तर आखडून बसायच पाय.
आणायची ९० रु किलोची चिकन. 
सांगायच बोकडच मिळतच नाय.
अहो पगार कमी सांगुन इज्जत गमवायची नाय.
मुंबई मुंबई मुंबई तिथे आहे तरी काय?


महाराष्ट्राचे लाडके दैवत पु.लं.चे पन्नास विनोद!


१)त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि
सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले "बाकी काही म्हणा, पण
मुलीने घराण्याचे नाव राखलं हो".

______________________________________________________
२)माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात
त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न ठरल्याची बातमी
कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच घाव घातला' .

______________________________________________________


३) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले,
तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, "हा मझा
मित्र शरद तळवलकर"
"हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे, हा
चांगलाच असरणार!" "हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना
विचारलं. "अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात
एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही. म्हणजे, हा माणूस सरळ
असणारच!"


कॉलेज जीवनातील १० सुखद क्षण....

१) शेवटची परीक्षा.... 

२) सकाळी उठल्यानंतरची ५ मिनिट झोप 
३) 'क्लास रद्द' झाल्याची बातमी सांगणारा मित्राचा/­मैत्रिणीचा फोन 
४) नवीन मित्रांसोबतची कॅंटीन मधील पहिला चहा 
५) एखाद्या जवळच्या मित्रासोबत/ ­­मैत्रीनिसोबत भांडण झालेले असते आणि तो/ती समोर दिसणे.... 
आणि मनातल्या मनात जुन्या आठवणी साचणे.... 
६) रात्रीचा मुव्ही शो सूटल्यानंतर मित्रांसोबत रूम/हॉस्टेल वर धिंगाणा घालत जाणे.... 
७) पावसात भिजत-भिजत मित्रांसोबत कॉलेज ला जाणे.....आणि कॅंटीन मध्ये जाऊन गरमा गरम भजी खाणे 
८) एखादी मुलगी क्लास मध्ये येत असताना तिला एखाद्या मुलाच्या नावाने चिडवणे.... 
९) मुलाने मुलीला मागितलेले पहिले जर्नल/ ­असाइनमेंट... 
१०) कॉलेज चा पहिला व शेवटचा दिवस ♥